Introduction
Property Gift केली की capital asset “transfer” झालीये का हा प्रश्न पडतो कारण मग Capital Gain Tax द्यावा लागेल हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की Capital asset transfer झाली की प्रत्येकच वेळी Capital gains taxation लागू होत नाही ते? Section 47 ही IT Act ची आवश्यक तरतूद आहे जी काही व्यवहारांना “transfer” या व्याख्येतून वगळते. हे महत्त्वाचे आहे कारण capital asset transfer झाल्यावर profit वर capital gains tax आकारला जातो. पण Section 47 बऱ्याच वेळा काही व्यवहार वगळून, tax चे ओझे कमी करून capital gains tax टाळण्यास मदत करते. थोडक्यात याचा अर्थ या परिस्थितीत कोणताही capital gains tax लागत नाही.
Gift, Will द्वारे capital asset दिली तर Capital Gain Tax लागेल?
एखाद्या व्यक्तीने आपली capital asset इतर कोणत्याही व्यक्तीला gift दिली, तर मग gift देणाऱ्या व्यक्तीला कोणताही capital gain होत नाही. पण Gift, Will द्वारे capital asset मिळणाऱ्या व्यक्तीला मात्र अश्या capital asset वर tax द्यावा लागेल.
Gift देणाऱ्या आणि Gift मिळणाऱ्या व्यक्तींवर tax चे परिणाम:-
Gift देणारी व्यक्ती (Donor):-
Section 47 नुसार जेव्हा एखादी व्यक्ती जेव्हा capital asset gift करते तेव्हा त्या व्यक्तीवर कोणतेही capital gains tax देण्याची जबाबदारी येत नाही. कारण त्याला Capital asset “transfer” केल्यावर Capital gain होत नाही त्यामुळे capital gains tax देण्याचा प्रश्नच येत नाही.
Gift मिळणारी व्यक्ती (Receiver):
Capital asset gift मध्ये मिळणाऱ्या व्यक्तीने भविष्यात अशी asset विकल्यास त्या व्यक्तीवर tax देण्याची जबाबदारी येते. अशा परिस्थितीत, capital asset च्या खरेदीची किंमत (cost of acquisition) मागील मालकाच्या (gift देणाऱ्या मालकाच्या) खरेदीची किंमत असेल आणि capital asset च्या period of holding चे calculation मागील मालकाने capital asset खरेदी केल्याच्या तारखेपासून केली जाईल.
उदाहरणार्थ, 2014मध्ये, श्री रवी यांनी ₹20,00,000ला घर खरेदी केले आणि नंतर त्यांनी ते घर त्यांच्या मुलाला Gift केले. मुलाने 2024 मध्ये,ते घर ₹60,00,000 ला विकले तर कोणाला Capital Gain Tax द्यावा लागेल?
श्री रवी यांनी property gift केल्यामुळे त्यांना Capital Gain झालेला नाही. त्यामुळे त्यांना Capital Gain Tax द्यावा लागणार नाही. वडिलांनी gift केल्यामुळे या gift च्या व्यवहारावर मुलाला tax द्यायला लागणार नाही पण घर विकल्यावर मात्र मुलाला Capital Gain Tax द्यावा लागेल.
घर विकल्यावरचे calculation :-
Property gift म्हणून मिळाली असेल तर period of holding हा मागील मालकाने( gift देणारी व्यक्ती ) Property खरेदी केल्याच्या तारखेपासून घेतला जाईल. त्यामुळे या परिस्थितीत 2014 पासून period of holding घेतला जाईल. म्हणून हे घर Long Term Capital Asset आहे. Capital Asset च्या खरेदीची किंमत (cost of acquisition) मागील मालकाच्या (gift देणाऱ्या मालकाच्या) खरेदीची किंमत असेल. त्यामुळे घर विकताना मुलाला खरेदीची किंमत (cost of acquisition) ₹20,00,000 घ्यावी लागेल.
थोडक्यात capital asset transfer होऊन सुद्धा श्री रवी यांना Capital Gain Tax द्यावा लागणार नाही आणि मुलाला पण ह्या gift वर tax द्यावा लागणार नाही, कसे ते आता आपण पुढे समजून घेऊ.
Property Gift वर Tax केव्हा द्यावा लागेल?
Capital asset gift मध्ये मिळणाऱ्या व्यक्तीला Section 56 of IT Act अंतर्गत त्या asset वर tax द्यावा लागेल. Section 56 of IT Act नुसार, कोणत्याही व्यक्तीकडून मिळालेल्या gift वर normal tax rates ने ‘Income from Other Sources’ खाली tax घेतला जाईल.
- हा Section सर्व करदात्यांना लागू आहे. थोडक्यात, व्यक्ती, HUF, Firm or Company, etc.
Gift दिलेली Property ३ भागांमध्ये विभागली जाते :-
Cash gifts | Immovable property { जमीन किंवा building किंवा दोन्हीही} | Movable property |
Cash gifts ची एकूण किंमत ₹ 50,000 पेक्षा जास्त असल्यास :- तर अशी एकूण संपूर्ण रक्कम cash gift म्हणून मिळालेल्या व्यक्तीच्या हातात taxable असेल. | काही पैसे(मोबदला) न देता मिळालेले gift:- property ची Stamp Duty value ₹ 50,000 पेक्षा जास्तअसल्यास :- तर असे gift मिळालेल्या व्यक्तीच्या हातात property ची संपूर्ण Stamp Duty value ‘Income from Other Sources’ खाली taxable असेल. कमी खरेदी किंमतीत मिळालेले gift [कमी किंमतीत मिळालेले gift ] :- जर Stamp Duty value आणि खरेदी किंमती मधील फरक खालील किंमतीपेक्षा जास्त असेल –
तर हा संपूर्ण फरक कमी खरेदी किंमतीत gift मिळालेल्या व्यक्तीच्या हातात ‘Income from Other Sources’ खाली taxable असेल.
| काही पैसे(मोबदला) न देता मिळालेले gift:- जर property चा fair market value ₹ 50,000 पेक्षा जास्त असल्यास :- तर असे gift मिळालेल्या व्यक्तीच्या हातात property ची एकूण fair market value ‘Income from Other Sources’ खाली (संपूर्ण) taxable असेल. कमी खरेदी किंमतीत मिळालेले gift [कमी किंमतीत मिळालेले gift ] :- जर fair market value आणि खरेदी किंमती मधील फरक ₹ 50,000 पेक्षा जास्त असल्यास तर हा एकूण फरक कमी खरेदी किंमतीत gift मिळालेल्या व्यक्तीच्या हातात ‘Income from Other Sources’ खाली (संपूर्ण) taxable असेल.
|
Property म्हणजे काय :-
- Immovable property { जमीन किंवा building किंवा दोन्हीही} 2. Shares & Securities 3. Jewellery 4. archaeological collection 5. drawings 5. painting 6. sculpture 7. any work of art 8. virtual digital assets
Property Gift केल्यावर Tax केव्हा द्यावा लागणार नाही:-
Property Gift केल्यावर tax द्यावा लागणार नाही जर cash gift किंवा property( immovable किंवा movable) खालील व्यक्तींकडून किंवा खालील परिस्थितीतून मिळाली तर :-
- कोणत्याही नातेवाईकाकडून किंवा
- व्यक्तीच्या लग्नाच्या निमित्ताने किंवा
- Will नुसार (इच्छापत्रानुसार) किंवा वारसाहक्काने किंवा
- स्थानिक प्रशासनाकडून
- कोणत्याही university किंवा hospital किंवा शैक्षणिक संस्था किंवा वैद्यकीय संस्था यांच्या कडून (ज्या section 10 of IT Act मध्ये नमूद केलेल्या आहेत.)
- charitable institution कडून
नातेवाईकांमध्ये कोणाचा समावेश आहे?
1)व्यक्तीचा (करदात्याचा) जोडीदार; 2) पालक 3)व्यक्तीचा भाऊ किंवा बहीण; 4)व्यक्तीच्या जोडीदाराचा भाऊ किंवा बहीण; 5) व्यक्तीच्या पालकांपैकी एकाचा भाऊ किंवा बहीण; 6)व्यक्तीचे कोणतेही पूर्वज किंवा वंशज; 7)व्यक्तीच्या जोडीदाराचे कोणतेही पूर्वज किंवा वंशज; 8) भाऊ किंवा बहिणीचा जोडीदार 9) व्यक्तीच्या जोडीदाराचे पूर्वज किंवा वंशज यांचे जोडीदार
Hindu Undivided Family साठी (HUF) :- HUF चे कोणतेही सदस्य.
उदाहरणे:-
Particulars | खरेदी किंमत / रक्कम | Stamp Duty Value | उत्तर |
रमेशला त्याच्या लग्नाच्या निमित्ताने मित्रांकडून Cash gift म्हणून मिळाली . | रक्कम ₹1,00,000 | ——— | Taxable नाही. कारण हे gift त्याला त्याच्या लग्नाच्या निमित्ताने मिळाले आहे. |
सीमाला building gift म्हणून मिळाली आहे. | 0 | ₹2,90,000 | संपूर्ण ₹2,90,000 Taxable आहे. कारण Stamp Duty Value ₹50,000 पेक्षा जास्त आहे. |
गीताला मामाकडून building gift म्हणून मिळाली आहे. | ₹35,000 | ₹2,00,000 | Taxable नाही कारण हे gift नातेवाइकाकडून मिळाले आहे. |
सुरेशने पुण्यात जमीन खरेदी केली. | ₹5,00,000 | ₹10,00,000 | खरेदीची किंमत आणि Stamp Duty Value मधील फरक [10,00,000 – 5,00,000] 5 लाख आहे. जो ₹50,000 आणि 10% of खरेदी किंमत पेक्षा जास्त आहे. त्यामुळे 5 लाखाचा संपूर्ण फरक Taxable आहे. |
महेशने मुंबईत जमीन खरेदी केली. | ₹20,00,000 | ₹20,50,000 | खरेदीची किंमत आणि Stamp Duty Value मधील फरक [20,00,000 – 20,50,000] ₹50,000 आहे. जो ₹50,000 आणि 10% of खरेदी किंमत पेक्षा जास्त नाहीये. त्यामुळे ही जमीन Taxable नाही. |
Particulars | Fair Market Value | खरेदी किंमत | उत्तर |
रमाने खालील properties एका वर्षामध्ये खरेदी केल्या आहेत :- | Fair Market Value आणि खरेदी किंमत यांमधील एकूण फरक ₹80,000 [2,20,000-1,40,000] आहे. जो ₹50,000 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे संपूर्ण ₹80,000 Taxable आहेत. | ||
1. Drawing | ₹80,000 | ₹60,000 | |
2. Painting | ₹85,000 | ₹50,000 | |
3. Jewellery | ₹55,000 | ₹30,000 | |
Total :- | ₹2,20,000 | ₹1,40,000 |
FAQ:-
सूचना:-
बऱ्याचवेळा tax planning करण्यासाठी पण property gift केली जाते त्यामुळे आयकर विभाग अश्या व्यवहारांची बारकाईने तपासणी करते विशेषत: जर एकूण रक्कम जास्त असेल तर म्हणून, gift प्रामाणिक हेतूने दिले आहे हे सिद्ध करण्यासाठी gift देणाऱ्या व्यक्तीचा निधीचा स्रोत दाखवणारी कागदपत्रे जपून ठेवावीत.