Property विकताय? मग 50 लाखांपर्यंतचा Capital Gain Tax वाचवा!!

Introduction

Section 54EC of the IT Act , long-term capital asset च्या विक्रीमुळे येणाऱ्या capital gains tax वर सवलत देण्याचे काम करतो. Capital Asset विकल्यावर लगेचच capital gains tax भरण्यापेक्षा करदाता विशिष्ट नमूद केलेल्या Bonds मध्ये गुंतवणूक करून सवलतीचा दावा करू शकतात. Long-term capital assets विकल्यावर Bonds मध्ये गुंतवणूक करून सुनियोजित आणि practical tax planning  करण्याचा उपाय करदात्यांसाठी उपलब्ध आहे.

Basic Condition:-

  1. Long- term capital asset जे जमीन किंवा इमारती किंवा दोन्हीही असतील तर त्यांच्या विक्रीतून येणाऱ्या capital gains वर सवलत दिली जाते.
  2. ही सवलत सर्व करदात्यांसाठी उपलब्ध आहे. थोडक्यात, व्यक्ती, HUF, Firm or Company, etc.
  3. करदात्याने खालील संस्थांद्वारे जारी केलेल्या bonds मध्ये गुंतवणूक केली तर सवलत दिली जाईल:-                        a. National Highway Authority of India (NHAI Bonds)                                                                           b. Rural Electrification Corporation Limited (REC Bonds)                                                                   c. Any other bond notified by the Central Government
  4.  जमीन, इमारत किंवा दोन्हीही विक्री झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत bonds मध्ये  गुंतवणूक करावी लागेल.
  5. Section 54EC अंतर्गत जारी केलेले bonds Fixed interest rates// income देतात. हा Fixed interest rates NHAI किंवा REC यांसारख्या संस्थांद्वारे bonds जारी करताना घोषित केला जातो.
जमीन, इमारत किंवा दोन्हीही विक्री झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत bonds मध्ये  गुंतवणूक करावी लागेल.
जमीन, इमारत किंवा दोन्हीही विक्री झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत bonds मध्ये  गुंतवणूक करावी लागेल.

         सवलतीची रक्कम :-

  1. Section 54EC अंतर्गत सवलतची रक्कम ही खालीलपैकी कमी रक्कम असेल:                                                        (a)  Capital Gains ची रक्कम;                                                                                                                            (b) specified bonds मध्ये गुंतवलेली रक्कम; किंवा                                                                                              (c) Rs. 50,00,000.

सवलत कधी मागे घेतली जाईल

  1. Capital Asset च्या विक्रीमुळे येणाऱ्या capital gains वर सवलत घेण्यासाठी bonds खरेदी करता येतात पण अशे खरेदी केलेले bonds पाच वर्षांच्या आत विकले गेले तर सवलत मिळालेल्या रक्कमेवर त्यावर्षी long-term capital gainम्हणून tax लागू होईल, ज्यावर्षी हे bonds विकले गेले आहेत.
  2. जर bonds खरेदी केल्यावर ५ वर्षाच्या आत cash मध्ये convert केले तर त्यापूर्वी सवलत  मिळालेल्या capital gain च्या रक्कमेवर ज्यावर्षी bonds cash मध्ये convert होतील त्यावर्षी त्या रक्कमेवर long-term capital gain म्हणून tax लागू होईल.

थोडक्यात bonds चा lock-in period 5 वर्षाचा असतो म्हणजे या 5 वर्षाच्या कालावधीत bonds विकता येणार नाहीत किंवा bonds वर कर्ज काढता येणार नाही जर असे केले तर capital gain tax लागू होईल.

FAQ

Conclusion

थोडक्यात ज्यांना एक property विकून दुसऱ्या property मध्ये गुंतवणूक करायची नाहीये, Capital Gain Tax पण द्यायचा नाहीये आणि उत्त्पन्न पण कमवायचे आहे त्यांनी bonds मध्ये गुंतवणूक करावी. या bonds चा lock-in period 5 वर्षाचा असतो. या 5 वर्षाच्या कालावधीत bonds च्या व्याजाचे उत्त्पन्न मिळते. हा एक चांगला गुंतवणूक आणि tax planning मिश्रित पर्याय करदात्यांसाठी उपलब्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top