ITR refund हा, जेव्हा करदाता आवश्यक tax च्या तुलनेत जास्त tax भरतो तेव्हा त्याला मिळतो. जेव्हा करदात्याने भरलेला tax आवश्यक रक्कमेपेक्षा जास्त असेल तर तो भरलेल्या जादा tax चा refund मागण्यास पात्र असेल. Tax हा advance tax किंवा TDS किंवा TCS किंवा self-assessment tax किंवा regular assessment च्या स्वरूपात असू शकतो.
section 237 नुसार, कोणत्याही वर्षामध्ये जर एखाद्या व्यक्तीने tax ची रक्कम आवश्यकतेपेक्षा जास्त भरली आहे हे जर तर त्याने Assessing Officer ला पटवून दिले तर तो भरलेल्या जादा tax चा refund घेऊ शकतो.
Section 139 अंतर्गत, नमूद केलेल्या कालमर्यादेत ITR भरला तरच refund चा दावा करता येईल. जे करदाते ITR-1, ITR-2 किंवा ITR-3 दाखल करतात त्यांच्यासाठी ज्वलंत प्रश्न असतो की refund कधी मिळेल.
आता ITR-1, ITR-2 , ITR-3 समजावून घेऊ.
ITR-1 Form: ह्या form चा वापर सामान्य रहिवासी व्यक्ती [Ordinary Resident (ROR)] करतो ज्याचे एकूण उत्पन्न 50 लाखांपर्यंत आहे यामध्ये पगाराचे उत्पन्न, एका घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न आणि बँक व्याज, ₹5,000 रुपयांपर्यंतचे कृषी उत्पन्न आणि इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असू शकतो.
ITR-2 Form: हा form व्यक्ती किंवा Hindu Undivided Families (HUFs) साठी आहे ज्यांचे काही व्यावसायिक उत्पन्न नाही पण ते ITR-1 साठी पात्र नाहीत.
ITR-3 Form: हा Form व्यक्ती किंवा Hindu Undivided Families (HUFs) साठी आहे जे व्यवसाय किंवा professional activities करतात जसे की चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर, वकील इत्यादी.
ITR-1 हा सगळ्या forms मध्ये basic form आहे. ITR-1 च्या प्रक्रियेची वेळ इतर फॉर्मच्या तुलनेत अधिक लवकर होते. परिणामी, form वर प्रक्रिया केल्यानंतर लवकरच refund जमा केला जातो. ITR-1 साठी refund चे दावे सहसा ITR-2 आणि ITR-3 पेक्षा जलद हाताळले जातात, कारण ITR-1 मध्ये नोंदवलेले उत्पन्न बाकी forms नोंदवलेल्या उत्पन्नापेक्षा सोपे असते. जे करदाते ITR-1 दाखल करतात त्यांना सहसा काही दिवस ते आठवड्यांत त्यांचा refund मिळतो, जर त्यात कोणतीही समस्या किंवा adjustment नसेल तर. पण जर अंतिम मुदतीच्या जवळ return भरल्यास या प्रक्रियेस वेळ लागू शकतो.
करदात्यांनी त्यांच्या returnची e-verification केल्यानंतरच आयकर विभाग refund चे प्रक्रिया सुरू करतो. आयकर विभागाच्या website नुसार, करदात्याच्या खात्यात refund जमा होण्यासाठी साधारणपणे चार ते पाच आठवडे लागतात.
बऱ्याच वेळा करदात्याला योग्य वेळेत refund मिळत नाही, अशा परिस्थितीत त्याला विलंब झालेल्या refund वर व्याज दिले जाते. Refund TDS किंवा TCS किंवा advance tax मुळे मिळत असेल तर करदात्याला प्रत्येक महिन्यासाठी किंवा महिन्याच्या काही भागासाठी 1/2 टक्के दराने व्याज मिळेल.
Section 139 अंतर्गत, नमूद केलेल्या कालमर्यादेत ITR भरला तर assessment year च्या 1st April पासून refund मंजूर झाल्याच्या तारखेपर्यंत व्याज मिळेल आणि जर ITR नमूद केलेल्या कालमर्यादेत भरला नाही तर ITR भरल्याच्या तारखेपासून refund मंजूर झाल्याच्या तारखेपर्यंत व्याज मिळेल.
परंतु जर section 143(1) अंतर्गत निर्धारित झालेल्या tax च्या रक्कमेपेक्षा किंवा regular assessment अंतर्गत निर्धारित झालेल्या tax च्या रक्कमेपेक्षा refund ची रक्कम 10% नी कमी असेल तर व्याज दिले जाणार नाही.
Section 143(1) अंतर्गत summary assessment केले जाते. जे करदात्याला संपर्क न करता केले जाणारे assessment आहे. summary assessment मध्ये income tax return ची प्राथमिक तपासणी केली जाते. या assessment अंतर्गत income tax return तपशीलवार छाननी केली जात नाही.
आयकर विभाग Section 143(1) अंतर्गत करदात्यांना सूचना पाठवली जाते ज्यामध्ये करदात्याने दिलेला income tax return आणि Section 143(1)अंतर्गत मूल्यांकन केलेला income tax return यांच्यात तुलना केली जाते आणि अजून tax देणे असेल तर ही सूचना demand नोटीस म्हणून दिली जाईल आणि जास्तीचे tax देणे नसेल तर ही income tax return च्या प्रक्रियेबद्दल फक्त एक सूचना राहील.
सामान्य परिस्थितीत, ज्या व्यक्तीने tax भरला आहे तो भरलेल्या जादा tax वर refund चा दावा करण्यास पात्र असतो. पण अशी काही विशेष प्रकरणे आहेत ज्यात करदात्याच्या व्यतिरिक्त दुसरी व्यक्ती पण refund चा दावा करू शकतात. Section 238 नुसार,खालील व्यक्तींना tax refund मिळण्याचा हक्क आहे:
Official income tax e-filing website वर जा.
तुमच्या PAN details सहित Log in करा.
Log in केल्यानंतर, ‘My Account’ या section वर click करा.
“Refund/Demand Status” बटणावर Click करा.
तुम्हाला तुमच्या income tax refund ची माहिती मिळेल ज्यामध्ये assessment year, refund चे current status , refund न मिळाल्यास त्याची कारणे आणि payment ची पद्धत यांसारख्ये तपशील मिळतील.
आयकर विभागाने ITR भरणाऱ्या आणि tax refund मिळणाऱ्या करदात्यांना फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सावधान केले आहे. गुन्हेगार स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी आहोत असे सांगून खोटे Phone calls , text messages , phishing emails करत आहेत आणि करदाता tax refund साठी पात्र असल्याचा दावा करत आहेत.
“खोट्या कॉल्सवर विश्वास ठेवू नका! प्राप्तिकर विभाग तुम्हाला त्वरित पैसे भरण्यासाठी कॉल करणार नाही,” हे विभागाने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे. विभागाने सांगितले आहे की ते refund च्या रकमेचा उल्लेख करणारे emails किंवा messages पाठवत नाहीत. Refund चा तपशील हा नेहमी ITR acknowledgment ला जोडून दिला जातो. याव्यतिरिक्त, विभागाने म्हटले आहे की ते email किंवा text message द्वारे पिन नंबर, पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड तपशील यासारखी संवेदनशील वैयक्तिक माहिती कधीही विचारत नाही.
आयकर विभाग refund ची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (बँक खात्यात थेट जमा होते) किंवा ‘Refund Cheque’ द्वारे पाठवेल. refund प्राप्त करण्यासाठी तुमचा ITR भरताना तुम्ही पिन कोडसह संपूर्ण पत्त्याच्या तपशीलांसह योग्य बँक खाते क्रमांक आणि IFSC Code देणे आवश्यक आहे. चेकद्वारे पाठवलेले refund स्पीड पोस्टद्वारे ITR मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवले जातात.
आयकर विभागाकडून होणारा संपर्क केवळ अधिकृत चॅनेलद्वारे होत आहे याची खात्री करून घ्या.
कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा खात्याचे तपशील, पासवर्ड इत्यादीसारखी संवेदनशील माहिती शेअर करू नका.
कोणताही संशयास्पद मेसेज आयकर विभाग आणि तुमच्या स्थानिक सायबर क्राईम अधिकाऱ्यांना कळवा.
antivirus software, firewalls वापरा जेणेकरून तुम्ही malware attack पासून सुरक्षित रहाल.
आयकर विभागाने tax return भरणाऱ्या करदात्यांना इशारा दिला आहे की खर्च झाल्याचे बोगस दावे, कमी कमाई झाल्याचा बोगस दावा, अतिरिक्त deductions चा बोगस दावा करू नये कारण हा दंडनीय गुन्हा आहे.
Refund च्या दाव्यांची पडताळणी केली जाते ज्यामुळे refund मिळण्यासाठी विलंब होऊ शकतो. ITR अचूक दाखल केल्याने refundsची जलद प्रक्रिया होते. करदात्याने ITR दाखल केल्यानंतर केलेल्या दाव्यांमध्ये कोणतीही तफावत असल्यास आयकर विभागाकडून सुधारित returnसाठी विनंती केली जाईल.
आयकर विभागाने हे ही म्हटले आहे की refund देण्यास उशीर झाल्यास, करदात्यांनी त्यांचे e-filing account तपासले पाहिजे की विभागाने त्यांना या संदर्भात काही संदेश पाठविला आहे का आणि जर पाठविला असेल तर तो “pending action and worklist section” tab मध्ये दिसेल.
Advance Tax चा अर्थ आणि त्याचा उद्देश:- Advance tax हा करदात्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर द्यायचा…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये income tax च्या बाबतीत काही बदल…
Introduction ITR( income tax returns) दरवर्षी 31 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात (मराठीत आपण याला आयकर…
Introduction Pan card आयकर विभाग UTI किंवा NSDL द्वारे जारी करते. तुम्ही तुमचा पत्ता बदलला…
Introduction Property Gift केली की capital asset "transfer" झालीये का हा प्रश्न पडतो कारण मग…
Introduction Section 54EC of the IT Act , long-term capital asset च्या विक्रीमुळे येणाऱ्या capital…