करदात्यांना Assessment Year (AY) आणि Financial Year (FY) मधील फरक माहित नसतो. ते बऱ्याच वेळा दोन्ही एकच समजतात ज्यामुळे त्यांचे income tax forms भरताना चुका होतात. Technology मुळे आता तुम्ही घर बसल्या online tax भरू शकता त्यामुळे स्वतःहून tax भरण्यापूर्वी काही अत्यावश्यक tax terminologies तुम्हाला समजल्या पाहिजेत. Taxation क्षेत्रामध्ये Assessment Year and Financial Year नेहमी वापरले जातात.
Financial year हे assessment year च्या लगेच आधीचे वर्ष असते. Financial year दरवर्षी 1 एप्रिल रोजी ते सुरू होते आणि पुढील वर्षाच्या 31 मार्च रोजी संपते. ( from 1 April to 31 March next year). ज्या वर्षात करदाता उत्पन्न कमावतो त्या वर्षाला financial year म्हणतात. Financial year ‘Previous Year’ म्हणून पण ओळखले जाते.
उदाहरणार्थ , 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत मिळालेले उत्पन्न हे current Financial year (FY) 2023-2024 मध्ये मिळालेले उत्पन्न आहे.
Financial Year (FY)2023-2024 कमावलेले उत्पन्न म्हणजे 1 एप्रिल 2023 आणि 31 मार्च 2024 दरम्यान कमावलेल्या पैशाचा समावेश होतो.
Assessment year हा 12 महिन्यांचा असतो जो दरवर्षी 1 एप्रिल रोजी सुरू होतो. जो 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आहे. Assessment year म्हणजे कालावधी ज्या दरम्यान तुम्ही मागील financial year मध्ये कमावलेल्या पैशावर tax आकारला जातो.
तुमचा income tax return संबंधित assessment year मध्ये भरले जाणे आवश्यक आहे. Financial year नंतर लगेच येणारे वर्ष Assessment year म्हणून ओळखले जाते.
उदाहरणार्थ, Financial year 2023-24 मध्ये मिळालेले उत्पन्न (म्हणजे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024) Assessment year 2024-25 (म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025) मध्ये taxable असेल.
Tax च्या उद्देशाने, एखाद्या व्यक्तीला ज्या वर्षी पैसे मिळतात ते वर्ष त्यांचे financial year म्हणून ओळखले जाते. Financial year नंतर लगेच येणारे वर्ष ज्यामध्ये मागील वर्षातील उत्पन्नावर tax भरला जातो आणि ITR file केला जातो त्याला Assessment year म्हणून ओळखले जाते.
उदाहरणार्थ, financial year 2023-2024 हे 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणारे आणि 31 मार्च 2024 रोजी संपणारे आहे. financial year संपल्यानंतर assessment year सुरू होत असल्याने, financial year 2023-2024 चे assessment year 2024-2025 आहे.
ज्या वर्षात उत्पन्न मिळते ते वर्ष Financial Year म्हणून ओळखले जाते. ज्या वर्षात असे उत्पन्न (मागील वर्षात मिळालेले) taxable होते ते Assessment year म्हणून ओळखले जाते.
Financial Year | Assessment year |
Assessment year च्या लगेच आधीचे वर्ष, ज्या वर्षात उत्पन्न मिळते ते वर्ष Financial year म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ, जर AY 2024-25 तर FY 2023-24.
| ज्या वर्षी उत्पन्नाचे मूल्यांकन केले जाते आणि त्या उत्पन्नावर tax भरला जातो ते वर्ष assessment year म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ, AY 2024-25 :- 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025. |
ITR refund हा, जेव्हा करदाता आवश्यक tax च्या तुलनेत जास्त tax भरतो तेव्हा त्याला मिळतो.…
Advance Tax चा अर्थ आणि त्याचा उद्देश:- Advance tax हा करदात्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर द्यायचा…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये income tax च्या बाबतीत काही बदल…
Introduction ITR( income tax returns) दरवर्षी 31 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात (मराठीत आपण याला आयकर…
Introduction Pan card आयकर विभाग UTI किंवा NSDL द्वारे जारी करते. तुम्ही तुमचा पत्ता बदलला…
Introduction Property Gift केली की capital asset "transfer" झालीये का हा प्रश्न पडतो कारण मग…
View Comments