Capital Asset म्हणजे काय?
a) करदात्याकडे असलेली कोणत्याही प्रकारची मालमत्ता मग त्या मालमत्तेचा करदात्याच्या व्यवसायाशी किंवा Profession शी संबंधित असो किंवा नसो ती capital asset असेल.
b)Foreign Institutional गुंतवणूकदाराकडे असलेले कोणतेही Securities.
c) 1 फेब्रुवारी 2021 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेला कोणताही ULIP(Unit Linked Insurance Plan ,यामध्ये गुंतवणुकी बरोबर life insurance cover चा पण फायद्या दिला जातो ) आणि सिंगल पॉलिसीसाठी प्रीमियम वार्षिक 250000 पेक्षा जास्त असेल किंवा एकापेक्षा अधिक पॉलिसीसाठी प्रीमियम वार्षिक 250000 पेक्षा जास्त असेल तर अश्या पोलिसी capital asset म्हणून मानल्या जातील .
d)पण खालील बाबी “capital asset” च्या व्याख्येतून वगळण्यात आल्या आहेत:
- Any stock-in-trade
उदा., मोटार कार डीलरसाठी मोटार कार किंवा ज्वेलरी व्यापाऱ्यासाठी सोने हे त्यांचे stock-in-trade आहेत आणि म्हणूनच, त्यांच्यासाठी ती capital assets नाहीत. - Personal Moveable Assets (उदा. वैयक्तिक कार, मोबाइल, घरगुती फर्निचर इ.).
- ग्रामीण भारतातील शेतजमीन.
- Gold Deposit bonds
- Deposit certificates
e) पण खालील गोष्टी Personal Moveable Assets असूनसुद्धा Capital Asset आहेत –
दागिने, पुरातत्व संग्रह, रेखाचित्रे, चित्रे, शिल्पे किंवा कोणत्याही कलाकृती
f)शहरी भागातील शेतजमीन ही नेहमी Capital Asset असते (ज्याला बिगरशेती जमीन असेही म्हणतात) खालील अटींच्यावर अवलंबून राहील
- 10,000 किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (cantonment board च्या )कार्यक्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रात वसलेली शेतजमीन किंवा
- खाली नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात वसलेली शेतजमीन-
शेवटच्या आधीच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार लोकसंख्येचा विचार केला जातो ज्यातील संबंधित आकडे वर्षाच्या पहिल्या दिवसापूर्वी प्रकाशित केले गेले आहेत. | कोणत्याही नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्थानिक हद्दीपासून हवाई पद्धतीने मोजलेले खालील दिलेल्या अंतराच्या मर्यादेत: |
10,000 पेक्षा जास्त ते 1 लाखांपर्यंतच | 2 किमीच्या आत |
1,00,000 पेक्षा जास्त ते 10 लाखांपर्यंतच | 6 किमीच्या आत |
10 लाखांपेक्षा जास्त | 10 किमीच्या आत |
शेवटच्या आधीच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार लोकसंख्येचा विचार केला जातो ज्यातील संबंधित आकडे वर्षाच्या पहिल्या दिवसापूर्वी प्रकाशित केले गेले आहेत. | कोणत्याही नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्थानिक हद्दीपासून हवाई पद्धतीने मोजलेले खालील दिलेल्या अंतराच्या मर्यादेत: |
More than 10,000 to 1 lakh | Within in 2 kms |
More than 1,00,000 to 10 lakh | Within in 6 kms |
More than 10 lakh | Within 10 kms |
- वर नमूद केलेल्या कोणत्याही मर्यादेत नसलेली शेतजमीन ग्रामीण भागातील शेतजमीन समजली जाते.
- म्हणून, शहरी शेती जमिनीची विक्री कृषी उत्पन्न म्हणून गणली जात नाही आणि त्यानुसार, अशा विक्रीवरील नफ्यावर section 45 नुसार कर आकारला जातो.
- Securities and Exchange Board of India Act, 1992 अंतर्गत केलेल्या नियमांनुसार अशा securities मध्ये गुंतवणूक केलेल्या Foreign Institutional गुंतवणूकदाराकडे असलेले कोणतेही securities नेहमीच Capital Asset म्हणून गणले जातील, म्हणून अशा securities ला stock-in-trade म्हणून मानले जाऊ शकत नाही.
खालील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत:
- करदात्याकडे असलेली कोणत्याही प्रकारची मालमत्ता मग त्या मालमत्तेचा करदात्याच्या व्यवसायाशी किंवा Profession शी संबंधित असो किंवा नसो ती capital asset असेल. passenger transport business मध्ये / प्रवासी वाहतूक व्यवसायात मालकाने प्रवासी नेण्यासाठी वापरलेली बस ही त्याची capital asset असेल.
- SEBI Act नुसार,Foreign Institutional Investor ने गुंतवणूक केलेल्या Securities नेहमीच capital asset असतात त्यामुळे अशा Securities ला stock-in-tradeमानले जाऊ शकत नाही.
Capital Asset चे प्रकार :-
Note-Period of holding म्हणजे मालमत्ता खरेदी केल्याच्या तारखेपासून मालमत्ता विकल्याच्या तारखेच्या आधीच्या तारखेपर्यंतचा असावा.
Short term Capital Asset
| Long term Capital Asset
|
1)General Capital Asset:- Unlisted Securities other than Shares, Gold | |
Period of holding विकण्याच्या तारखेपूर्वी 24 महिन्यांपर्यंतच आहे.(Period of holding is up to 36 months before the date of transfer) | Period of holding विकण्याच्या तारखेपूर्वी 24 महिन्यांपेक्षा जास्त आहे.(Period of holding is more than 36 months before the date of transfer) |
2)Financial Capital Asset:- Listed Equity Shares, Mutual Fund(only Equity Oriented Fund), Other Listed Securities | |
Period of holding विकण्याच्या तारखेपूर्वी 12 महिन्यांपर्यंतच आहे (Period of holding is up to 12 months before the date of transfer) | Period of holding विकण्याच्या तारखेपूर्वी 12 महिन्यांपेक्षा जास्त आहे. (Period of holding more than 12 months before the date of transfer.) |
3)Special Capital Asset:- Unlisted shares, Immovable Property {land or building or both}, Unlisted bonds & debentures | |
Period of holding विकण्याच्या तारखेपूर्वी 24 महिन्यांपर्यंतच आहे. (Period of holding is up to 24 months before the date of transfer) | Period of holding विकण्याच्या तारखेपूर्वी 24 महिन्यांपेक्षा जास्त आहे.(Period of holding more than 24 months before the date of transfer.) |
Finance Act 2024 नुसार, थोडक्यात Listed Equity Shares, Mutual Fund(only Equity Oriented Fund), Other Listed Securities यांचा holding period 12 महिन्यांचा आहे बाकी सर्व Assets चा holding period 24 महिन्यांचा असेल.