Advance Tax चा अर्थ आणि त्याचा उद्देश:-
Advance tax हा करदात्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर द्यायचा असतो. उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये पगार, भाडे, Capital Gains, लॉटरीची कमाई, FD आणि इतर उत्पन्नाचा समावेश आहे. e-filing portal वापरून ऑनलाइन पेमेंट करता येते. साधारणपणे मागील वर्षाचे उत्पन्न assessment year मध्ये करपात्र असते, तरीही करदात्याने मागील वर्षातच (previous year) advance tax, TDS & TCS कर भरणे आवश्यक असते.
Advance tax कोणाला द्यावा लागतो?
- IT Act च्या Section 208 नुसार, tax ची रक्कम एका आर्थिक वर्षात ₹10,000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याच आर्थिक वर्षात करदात्याला Advance tax द्यावा लागेल.
- IT Act च्या Section 44AD किंवा 44ADA मध्ये नमूद केलेल्या presumptive taxation scheme च्या अंतर्गत व्यवसाय करणाऱ्या करदात्यांना Advance tax द्यावा लागेल.
Advance tax कोणाला द्यावा लागणार नाही?
- जर टॅक्सची रक्कम ₹10,000 च्या खाली असेल तर advance tax द्यावा लागणार नाही म्हणजे टॅक्सची रक्कम ₹9,999 असेल तर advance tax द्यायचा नाही.
- Indian resident individual म्हणजे भारतीय निवासी व्यक्तीला advance tax द्यावा लागणार नाही जर:- त्या व्यक्तीचे “Profits and gains of business or profession” (PGBP) म्हणजे “व्यावसायिक उत्पन्न “नसेल तर आणि त्या व्यक्तीने मागील वर्षात कधीही साठ वर्षे किंवा त्याहून अधिक पूर्ण केले असतील तर.
याचा अर्थ असा होतो की ज्येष्ठ नागरिक (60 वर्षे किंवा त्याहून अधिक) ज्यांचे व्यावसायिक उत्पन्न (PGBP) असेल त्यांना advance tax द्यावा लागेल.
Advance tax कसा निघतो?
Particulars | Amount |
Income under the 5 heads of income Adjustment in respect of Brought Forward GROSS TOTAL INCOME Less: Deduction admissible under Chapter VI -A | Xxx xxx XXX (xxx) |
TAXABLE INCOME Tax on Taxable INCOME Less: Rebate | XXX Xxx (xxx) |
TAX PAYABLE Add: Surcharge | XXX Xxx |
NET TAX PAYABLE Less: Relief under Sec. 89,90,90A,91 | XXX (xxx) |
Tax Liability Less: TDS/TCS Less: MAT/AMT Credit under Sec. 115JAA | Xxx (xxx) (xxx) |
ADVANCE TAX | XXX |
Advance Tax च्या calculation पुढील गोष्टी लक्ष्यात ठेवा:-
- हे माहित आहे की, tax च्या calculation मधून TDS वजा केले की Advance Tax ची रक्कम मिळते. पण “Tax कपात करण्यायोग्य आहे पण वजा केलेले नाही”( tax deductible but not so deducted) असे असेल तर अश्या परिस्थितीत advance tax मधून TDS वजा केला जाणार नाही.
- हे tax चे calculation करताना त्यामध्ये कृषी उत्पन्न देखील घेतले जाईल.
- Advance tax चा कोणताही हप्ता भरण्याच्या देय तारखेस ‘बँकिंग सुट्टी’ आल्यास payment लगेच पुढील ‘working day’ ला करता येईल आणि अश्या वेळेस section 234B किंवा 234C अंतर्गत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
Advance Tax हप्त्यांमध्ये देण्याच्या देय तारखा:-
(A) व्यक्ती आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी advance taxच्या देय तारखा:-
देय तारखा | देय रक्कम |
15 जून रोजी किंवा त्यापूर्वी | advance tax च्या किमान 15% |
15 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी | advance tax च्या किमान 45% (-) पहिल्या हप्त्यात भरलेली advance tax ची रक्कम |
15 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी | advance tax च्या किमान 75% (-) पहिल्या दोन हप्त्यात भरलेली advance tax ची रक्कम |
15 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी | 100% advance tax (-) पहिल्या तीन हप्त्यात भरलेली advance tax ची रक्कम |
(B) Sections 44AD & 44ADA अंतर्गत Presumptive Taxation Scheme निवडलेल्या करदात्यांसाठी – व्यवसाय उत्पन्न
15 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी | 100% advance tax |
Presumptive Taxation Scheme for businesses :- ज्या करदात्यांनी section 44AD अंतर्गत presumptive taxation scheme निवडली तर त्यांना advance tax ची संपूर्ण रक्कम 15 मार्च किंवा त्यापूर्वी एका हप्त्यात भरावी लागेल.
Presumptive Taxation Scheme for professionals :- Section 44ADA अंतर्गत presumptive taxation scheme ही खाली नमूद केलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या professionals करदात्यांसाठी आहे –
Legal, medical, engineering, architect, accountancy, interior decoration, film artists, IT profession
त्यांना advance tax ची संपूर्ण रक्कम 15 मार्च किंवा त्यापूर्वी एका हप्त्यात भरावी लागेल.
Businesses आणि professionals या दोघांनीही त्या आर्थिक वर्षात 31 मार्च किंवा त्यापूर्वी advance tax म्हणून रक्कम भरली तर ते देखील advance tax भरला गेला आहे असे मानले जाईल. थोडक्यात करदात्यांकडे 31 मार्चपर्यंत सर्व tax रक्कम भरण्याचा पर्याय आहे.
Advance Tax ऑनलाइन कसा भरावा?
Step 1- Official income tax e-filing portal भेट द्या.
Step 2- ‘Quick Links’ अंतर्गत ‘e-pay Tax’ वर क्लिक करा.
Step 3-‘PAN’ आणि ‘Mobile Number’ लिहा आणि ‘Continue’ वर क्लिक करा.
Step 4- प्राप्त झालेला ‘6 digit OTP’ भरा आणि पुढे ‘Proceed’वर क्लिक करा.
Step 5- ‘Income Tax’ पर्याय सांगणारा पहिला टॅब निवडा आणि नंतर ‘Continue’ वर क्लिक करा.
Step 6- ‘Advance Tax (100)’ म्हणून ‘Assessment Year’ आणि ‘Type of Payment’ निवडा आणि नंतर ‘Continue’ वर क्लिक करा.
Step 7- Tax बद्दलचा सर्व तपशील भरा.
Step 8- ‘Payment’ पद्धत आणि ‘Bank’ निवडा आणि नंतर ‘Continue’ वर क्लिक करा.
Step 9- ‘Challan’ चे preview करा आणि ‘Pay Now’ वर क्लिक करा.
Step 10- Payment पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला पुढील स्क्रीनवर एक पावती (acknowledgement) मिळेल. तुम्ही challan च्या उजव्या बाजूला ‘BSR code and challan serial number’ पाहू शकता. भविष्यातील संदर्भासाठी या tax पावतीची एक copy सांभाळून ठेवा.
Advance tax वर व्याज केव्हा द्यावे लागेल?
A. Advance tax भरण्यास उशीर केल्यास Section 234C अंतर्गत व्याज द्यावे लागणारे व्याज:
Due Date | व्याज दर | Particulars | व्याजाचा कालावधी | Calculation |
मागील वर्षाच्या 15 जूनपर्यंत | 1% प्रति महिना | 15 जूनपर्यंत advance tax 15% पेक्षा कमी भरल्यास | 3 महिने | Due tax च्या रक्कमेचे 15% (-) 15 जूनपर्यंत भरलेला advance tax |
मागील वर्षाच्या 15 सप्टेंबरपर्यंत | 1% प्रति महिना | 15 सप्टेंबरपर्यंत advance tax 45% पेक्षा कमी भरल्यास | 3 महिने | Due tax च्या रक्कमेचे 45% (-) 15 सप्टेंबरपर्यंत भरलेला advance tax |
मागील वर्षाच्या 15 डिसेंबरपर्यंत | 1% प्रति महिना | 15 डिसेंबरपर्यंत advance tax 75% पेक्षा कमी भरल्यास | 3 महिने | Due tax च्या रक्कमेचे 75% (-) 15 डिसेंबरपर्यंत भरलेला advance tax |
मागील वर्षाच्या 15 15 मार्चपर्यंत | 1% प्रति महिना | 15 मार्चपर्यंत advance tax 100% पेक्षा कमी भरल्यास | 1 महिना | Due tax च्या रक्कमेचे 100% (-) 15 मार्चपर्यंत भरलेला advance tax |
- जर करदात्याने वर्षासाठी देय असलेल्या एकूण advance taxच्या 12% आणि 36% दराने advance tax भरला तर पहिल्या दोन हप्त्यांसाठी section 234C अंतर्गत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
- Section 44AD आणि 44ADA अंतर्गत presumptive taxation Scheme ची करदात्यांनी निवड केल्यास :- 15 मार्चच्या नंतर advance tax भरल्यास 1% प्रति महिना व्याज 1 महिन्यासाठी आकारला जाईल.
- Capital gains आणि Crossword puzzles,लॉटरी अश्या सर्व प्रकारच्या उत्पन्नावर advance tax द्यावा लागतो पण करदात्याला अश्या उत्पन्नाचा अंदाज लावणे शक्य नसते. त्यामुळे असे कोणतेही उत्पन्न हप्त्याच्या देय तारखेनंतर मिळाल्यास टॅक्सची संपूर्ण रक्कम ( TDS असल्यास, तो वजा झाल्यानंतर) उर्वरित हप्त्यांमध्ये किंवा कोणताही हप्ता देय नसेल तर त्या संबंधित आर्थिक वर्षाच्या 31 मार्चपर्यंत संपूर्ण भरावी. जर देय असलेल्या टॅक्सची रक्कम भरली असेल, तर उशीरा payment झाल्यास कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
B. Advance tax न भरल्यास किंवा कमी भरल्यास Section 234B अंतर्गत द्यावे लागणारे व्याज:
जर करदात्याने advance tax न भरल्यास किंवा भरलेला advance tax निर्धारित tax च्या 90% पेक्षा कमी असल्यास, करदाता प्रत्येक महिन्यासाठी किंवा महिन्याच्या काही भागासाठी 1% दराने साधे व्याज (simple interest) देण्यास जबाबदार असेल.
Useful information .
Thank you