ITR refund ची वाट बघताय? refund लवकर कसा मिळेल ते जाणून घ्या

ITR refund हा, जेव्हा करदाता आवश्यक tax च्या तुलनेत जास्त tax भरतो तेव्हा त्याला मिळतो. जेव्हा करदात्याने भरलेला tax आवश्यक रक्कमेपेक्षा जास्त असेल तर तो भरलेल्या जादा tax चा refund मागण्यास पात्र असेल. Tax हा advance tax किंवा TDS किंवा TCS किंवा self-assessment tax किंवा regular assessment च्या स्वरूपात असू शकतो.

Refund मिळण्याची प्रक्रिया:-

section 237 नुसार, कोणत्याही वर्षामध्ये जर एखाद्या व्यक्तीने tax ची रक्कम आवश्यकतेपेक्षा जास्त भरली आहे हे जर तर त्याने Assessing Officer ला पटवून दिले तर तो भरलेल्या जादा tax चा refund घेऊ शकतो.

Section 139 अंतर्गत, नमूद केलेल्या कालमर्यादेत ITR भरला तरच refund चा दावा करता येईल. जे करदाते ITR-1, ITR-2 किंवा ITR-3 दाखल करतात त्यांच्यासाठी ज्वलंत प्रश्न असतो की refund कधी मिळेल.

आता ITR-1, ITR-2 , ITR-3 समजावून घेऊ.

ITR-1 Form: ह्या form चा वापर सामान्य रहिवासी व्यक्ती [Ordinary Resident (ROR)] करतो ज्याचे एकूण उत्पन्न 50 लाखांपर्यंत आहे यामध्ये पगाराचे उत्पन्न, एका घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न आणि बँक व्याज, ₹5,000 रुपयांपर्यंतचे कृषी उत्पन्न आणि इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असू शकतो.

ITR-2 Form: हा form व्यक्ती किंवा Hindu Undivided Families (HUFs) साठी आहे ज्यांचे काही व्यावसायिक उत्पन्न नाही पण ते ITR-1 साठी पात्र नाहीत.

ITR-3 Form: हा Form व्यक्ती किंवा Hindu Undivided Families (HUFs) साठी आहे जे व्यवसाय किंवा professional activities करतात जसे की चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर, वकील इत्यादी.

ITR-1 हा सगळ्या forms मध्ये basic form आहे. ITR-1 च्या प्रक्रियेची वेळ इतर फॉर्मच्या तुलनेत अधिक लवकर होते. परिणामी, form वर प्रक्रिया केल्यानंतर लवकरच refund जमा केला जातो. ITR-1 साठी refund चे दावे सहसा ITR-2 आणि ITR-3 पेक्षा जलद हाताळले जातात, कारण ITR-1 मध्ये नोंदवलेले उत्पन्न बाकी forms नोंदवलेल्या उत्पन्नापेक्षा सोपे असते. जे करदाते ITR-1 दाखल करतात त्यांना सहसा काही दिवस ते आठवड्यांत त्यांचा refund मिळतो, जर त्यात कोणतीही समस्या किंवा adjustment नसेल तर. पण जर अंतिम मुदतीच्या जवळ return भरल्यास या प्रक्रियेस वेळ लागू शकतो.

 ITR भरल्यानंतर tax refund मिळण्यासाठी किती वेळ लागेल आणि तुम्हाला व्याज मिळेल का?

करदात्यांनी त्यांच्या returnची e-verification केल्यानंतरच आयकर विभाग refund चे प्रक्रिया सुरू करतो. आयकर विभागाच्या website नुसार, करदात्याच्या खात्यात refund जमा होण्यासाठी साधारणपणे चार ते पाच आठवडे लागतात.

बऱ्याच वेळा करदात्याला योग्य वेळेत refund मिळत नाही, अशा परिस्थितीत त्याला विलंब झालेल्या refund वर व्याज दिले जाते. Refund TDS किंवा TCS किंवा advance tax मुळे मिळत असेल तर करदात्याला प्रत्येक महिन्यासाठी किंवा महिन्याच्या काही भागासाठी 1/2 टक्के दराने व्याज मिळेल.

Section 139 अंतर्गत, नमूद केलेल्या कालमर्यादेत ITR भरला तर assessment year च्या 1st April पासून refund मंजूर झाल्याच्या तारखेपर्यंत व्याज मिळेल आणि जर ITR नमूद केलेल्या कालमर्यादेत भरला नाही तर ITR भरल्याच्या तारखेपासून refund मंजूर झाल्याच्या तारखेपर्यंत व्याज मिळेल.

परंतु जर section 143(1) अंतर्गत निर्धारित झालेल्या tax च्या रक्कमेपेक्षा किंवा regular assessment अंतर्गत निर्धारित झालेल्या tax च्या रक्कमेपेक्षा refund ची रक्कम 10% नी कमी असेल तर व्याज दिले जाणार नाही.

Section 143(1) अंतर्गत summary assessment केले जाते. जे करदात्याला संपर्क न करता केले जाणारे assessment आहे. summary assessment मध्ये income tax return ची प्राथमिक तपासणी केली जाते. या assessment अंतर्गत income tax return तपशीलवार छाननी केली जात नाही.

आयकर विभाग Section 143(1) अंतर्गत करदात्यांना सूचना पाठवली जाते ज्यामध्ये करदात्याने दिलेला income tax return आणि Section 143(1)अंतर्गत मूल्यांकन केलेला income tax return यांच्यात तुलना केली जाते आणि अजून tax देणे असेल तर ही सूचना demand नोटीस म्हणून दिली जाईल आणि जास्तीचे tax देणे नसेल तर ही income tax return च्या प्रक्रियेबद्दल फक्त एक सूचना राहील.

करदात्याच्या खात्यात refund जमा होण्यासाठी साधारणपणे चार ते पाच आठवडे लागतात.
करदात्याच्या खात्यात refund जमा होण्यासाठी साधारणपणे चार ते पाच आठवडे लागतात.

Refund चा दावा करण्यास पात्र व्यक्ती:-

सामान्य परिस्थितीत, ज्या व्यक्तीने tax भरला आहे तो भरलेल्या जादा tax वर refund चा दावा करण्यास पात्र असतो. पण अशी काही विशेष प्रकरणे आहेत ज्यात करदात्याच्या व्यतिरिक्त दुसरी व्यक्ती पण refund चा दावा करू शकतात. Section 238 नुसार,खालील व्यक्तींना tax refund मिळण्याचा हक्क आहे:

  • जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न समाविष्ट केले जात असेल तर ती व्यक्ती अश्या समाविष्ट उत्पन्नावर refund चा दावा करण्यासाठी पात्र असते.
    उदा. IT Act च्या Clubbing तरतुदींनुसार, अल्पवयीन मुलाचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात समाविष्ट असते तर  अश्या उत्पन्नावर पालक refund चा दावा करू शकतात.
  • मृत्यू, दिवाळखोरी, liquidation किंवा इतर काही कारणांमुळे करदाता refund चा दावा करू शकत नसेल तर त्याचा कायदेशीर प्रतिनिधी किंवा trustee किंवा guardian मात्र refund चा दावा करू शकतात.

Refund च्या प्रक्रियेवर खालील गोष्टींचा परिणाम होतो:-

  1. ITR माहितीची अचूकता: ITR मधील त्रुटी किंवा विसंगतीमुळे विलंब होऊ शकतो किंवा refund चा दावा नाकारला जाऊ शकतो.
  2. E-verification: तुमच्या return ची त्वरित E-verification केल्याने refund ची प्रक्रिया लवकर होते.
  3. बँक खात्याचे तपशील: refund लवकर मिळण्यासाठी ITR मध्ये योग्य बँक खात्याचे तपशील दिल्याची खात्री करणे गरजेचे आहे.
  4. TDS : दावा केलेला TDS आणि प्रत्यक्षात कपात झालेला TDS यांच्यात फरक असेल तर अतिरिक्त पडताळणी होऊ शकते.
  5. जास्त किमतींचा refund : जास्त किमतींच्या refund च्या रकमेमुळे अतिरिक्त तपासणी सुरू होऊ शकते, त्यामुळे refund प्रक्रियेची वेळ वाढू शकते.

ITR refund status:-

Income tax refund प्रक्रिया Official Income Tax Department portal द्वारे online track केली जाऊ शकते.
Income tax refund प्रक्रिया Official Income Tax Department portal द्वारे online track केली जाऊ शकते.
Income tax e-filing portal वर refund status :-

Official income tax e-filing website वर जा.

तुमच्या PAN details सहित Log in करा.

Log in केल्यानंतर, ‘My Account’ या section वर click करा.

“Refund/Demand Status” बटणावर Click करा.

तुम्हाला तुमच्या income tax refund ची माहिती मिळेल ज्यामध्ये assessment year, refund चे current status , refund न मिळाल्यास त्याची कारणे आणि payment ची पद्धत यांसारख्ये तपशील मिळतील.

Refund घोटाळ्यांविरुद् आयकर विभागाची चेतावणी:-

आयकर विभागाने ITR भरणाऱ्या आणि tax refund मिळणाऱ्या करदात्यांना फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सावधान केले आहे. गुन्हेगार स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी आहोत असे सांगून खोटे Phone calls , text messages , phishing emails करत आहेत आणि करदाता tax refund साठी पात्र असल्याचा दावा करत आहेत.

“खोट्या कॉल्सवर विश्वास ठेवू नका! प्राप्तिकर विभाग तुम्हाला त्वरित पैसे भरण्यासाठी कॉल करणार नाही,” हे विभागाने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे. विभागाने सांगितले आहे की ते refund च्या रकमेचा उल्लेख करणारे emails किंवा messages पाठवत नाहीत. Refund चा तपशील हा नेहमी ITR acknowledgment ला जोडून दिला जातो. याव्यतिरिक्त, विभागाने म्हटले आहे की ते email किंवा text message द्वारे पिन नंबर, पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड तपशील यासारखी संवेदनशील वैयक्तिक माहिती कधीही विचारत नाही.

गुन्हेगारांकडून केले जाणारे काही घोटाळे:-

  1. बनावट कॉल्स : गुन्हेगार आयकर विभागातून आहोत असे भासवून करदात्यांना कॉल्स करतात आणि दंड टाळण्यासाठी तातडीने पैसे देण्यासाठी दबाव टाकतात.पण विभागाने म्हटले आहे की ते त्वरित payment साठी करदात्यांना फोनद्वारे कधीही संपर्क साधत नाही.
  2. Phishing messages: करदात्यांना ITR मंजूर झाल्याचा दावा करणारे messages पाठवले जातात की ते विशिष्ट रकमेच्या Refund साठी पात्र आहेत. मेसेजमध्ये खात्याच्या ‘verification’ साठी लिंक असते जी खरंतर संवेदनशील माहिती चोरण्यासाठी पाठवलेली असते.
  3. बनावट pop-ups आणि emails: गुन्हेगार आयकर विभागाचे बनावट pop-ups आणि emails तयार करून बँक खाते, क्रेडिट कार्ड इत्यादीसारखी आर्थिक आणि वैयक्तिक माहिती चोरतात.

आयकर विभाग refund ची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (बँक खात्यात थेट जमा होते) किंवा ‘Refund Cheque’ द्वारे पाठवेल. refund प्राप्त करण्यासाठी तुमचा ITR भरताना तुम्ही पिन कोडसह संपूर्ण पत्त्याच्या तपशीलांसह योग्य बँक खाते क्रमांक आणि IFSC Code देणे आवश्यक आहे. चेकद्वारे पाठवलेले refund स्पीड पोस्टद्वारे ITR मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवले जातात.

फसवणुकीपासून कसे दूर रहावे:-

आयकर विभागाकडून होणारा संपर्क केवळ अधिकृत चॅनेलद्वारे होत आहे याची खात्री करून घ्या.

कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा खात्याचे तपशील, पासवर्ड इत्यादीसारखी संवेदनशील माहिती शेअर करू नका.

कोणताही संशयास्पद मेसेज आयकर विभाग आणि तुमच्या स्थानिक सायबर क्राईम अधिकाऱ्यांना कळवा.

antivirus software, firewalls वापरा जेणेकरून तुम्ही malware attack पासून सुरक्षित रहाल.

Refund मिळविण्यासाठी बोगस दावे दंडनीय गुन्हा, आयकर विभागाचा इशारा

आयकर विभागाने tax return भरणाऱ्या करदात्यांना इशारा दिला आहे की खर्च झाल्याचे बोगस दावे, कमी कमाई झाल्याचा बोगस दावा, अतिरिक्त deductions चा बोगस दावा करू नये कारण हा दंडनीय गुन्हा आहे.

Refund च्या दाव्यांची पडताळणी केली जाते ज्यामुळे refund मिळण्यासाठी विलंब होऊ शकतो. ITR अचूक दाखल केल्याने refundsची जलद प्रक्रिया होते. करदात्याने ITR दाखल केल्यानंतर केलेल्या दाव्यांमध्ये कोणतीही तफावत असल्यास आयकर विभागाकडून सुधारित returnसाठी विनंती केली जाईल.

आयकर विभागाने हे ही म्हटले आहे की refund देण्यास उशीर झाल्यास, करदात्यांनी त्यांचे e-filing account तपासले पाहिजे की विभागाने त्यांना या संदर्भात काही संदेश पाठविला आहे का आणि जर पाठविला असेल तर तो “pending action and worklist section” tab मध्ये दिसेल.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top