FAQ:-
- निवासी घराच्या विक्रीमुळे येणाऱ्या capital gain वर काय सवलती आहेत? What are the various exemptions available in respect of capital gains arising on the transfer of capital assets?
निवासी घराच्या विक्रीमुळे येणाऱ्या capital gain वर सवलत दिली जाईल जर नवीन निवासी घराच्या खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी capital gains ची रक्कम गुंतवली असेल तर.
2. Section 54 अंतर्गत कोण सवलत मागू शकते? Who can claim an exemption under section 54?
ही सवलत केवळ Individual (व्यक्ती) किंवा HUF साठी आहे.
3. या सवलतीसाठी कोणती Capital Asset पात्र आहे? Which capital asset is qualified for section 54 exemption?
जर निवासी घर long-term capital Asset पाहिजे किंवा अशा घराला लगतची जमीन जी निवासी घराचे उत्पन्न याखाली taxable असेल अशा long-term Capital Asset च्या विक्रीतून Capital gain झाला तरच सवलत दिली जाते.
4.Section 54 अंतर्गत सवलत मिळविण्यासाठी कोणती नवीन मालमत्ता खरेदी करावी? Which new asset should be acquired for claiming exemption under section 54?
Capital gain ची रक्कम निवासी घराच्या मालमत्तेच्या खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी गुंतवल्यास सवलत मिळू शकते. पण, असे नवीन घर भारतात असेल तरच सवलत दिली जाते.
5. Section 54 अंतर्गत जास्तीत जास्त किती सवलत मिळेल ? What is the maximum amount of exemption allowed under section 54?
सवलतची रक्कम ही खालीलपैकी कमी रक्कम असेल:-
- निवासी घराच्या विक्रीवर येणाऱ्या Capital Gains ची रक्कम;
- नवीन निवासी घराच्या मालमत्तेच्या खरेदी किंवा बांधकामामध्ये गुंतवणूक केलेली रक्कम आणि Capital Gain Account Scheme मध्ये जमा केलेली एकूण रक्कमेचा समावेश आहे.
- रु. 10 कोटी.
जर नवीन घराच्या मालमत्तेत गुंतवलेली रक्कम आणि Capital Gain Account scheme मध्ये जमा केलेली रक्कम रु.10 कोटी पेक्षा जास्त असल्यास, threshold limit पहिल्यांदा नवीन घराच्या मालमत्तेत गुंतवलेल्या रकमेशी adjust केली जाईल जर नवीन घराच्या मालमत्तेतील गुंतवणूक रु. 10 कोटी पेक्षा कमी असल्यास, उर्वरित रक्कम Capital Gain Account scheme मध्ये जमा केली जाईल.
6. नवीन घरामध्ये गुंतवणूक करताना घराच्या संख्येवर काही मर्यादा आहेत का ? Is there any limit on the number of house properties in which further investment can be made?
Section 54 अंतर्गत केवळ एका घराच्या मालमत्तेमध्ये गुंतवणुकीसाठी सवलत दिली जात होती. परंतु AY 2020-21, पासून long-term capital gains ची रक्कम रु.2 कोटीपेक्षा जास्त नसल्यास 2 घरांच्या मालमत्तेच्या खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी सवलतीचा दावा केला जाऊ शकतो. हा पर्याय आयुष्यात एकदाच घेतला जाऊ शकतो, म्हणजे एकदा या पर्यायावर दावा केल्यावर, त्या किंवा त्यानंतरच्या कोणत्याही आर्थिक वर्षांसाठी त्याचा लाभ घेता येणार नाही.
7. नवीन घराची खरेदी किंवा बांधकामामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ मर्यादा काय आहे? What is the time limit for making investment in new asset under section 54?
जुने घर विकण्याच्या तारखेपूर्वी एक वर्षाच्या आत किंवा विकल्याच्या तारखेनंतर दोन वर्षांच्या आत करदात्याने दुसरे निवासी घर भारतात घेतले पाहिजे किंवा जुने घर विकल्याच्या तारखेनंतर तीन वर्षांच्या आत निवासी घर भारतात बांधावे.
8.Capital Gains Account scheme काय आहे? What is the Capital Gains Account Scheme?
Capital Gains Accounts Scheme अंतर्गत उघडलेली खाती ही विशेष उद्देशाची खाती आहेत जी अधिकृत बँकेत उघडली जातात. जर करदाता Income tax return भरण्याच्या तारखेपर्यंत निवासी घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी capital gains चा वापर करू शकत नसेल, तर तो capital gains तून सवलत मिळण्यासाठी अशा खात्यांमध्ये रक्कम जमा करू शकतो.
9. वापरण्यात न आलेली / खर्च न केलेली Capital Gain ची रक्कम Capital Gain Scheme Account मध्ये जमा करण्याची कालमर्यादा किती आहे? What is the time limit to deposit the unutilized amount in Capital Gain Scheme Account?
जर Income tax return भरण्याच्या तारखेपर्यंत, घराच्या विक्रीमुळे येणारा Capital gain (संपूर्ण किंवा अंशतः) दुसरं घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी वापरला गेला नाही तर अशा न वापरलेल्या Capital gain ची रक्कम Capital Gains Deposit Accounts Scheme, 1988 नुसार public sector बँकच्या कोणत्याही शाखेत Capital Gains Deposit Account Scheme मध्ये जमा करून सवलतीचा चा लाभ घेता येईल.
2 वर्षे/3 वर्षांचा नियमानुसार दिलेला कालावधी संपल्यानंतर, Capital Gains Account Scheme मध्ये न वापरलेल्या रकमेवर long-term capital gains च्याद्वारे income tax आकारला जाईल ज्या वर्षी 2 वर्षे/3 वर्षांचा कालावधी संपेल.
10. निवासी घराच्या बांधकामासाठी जमिनीच्या plot मध्ये केलेली गुंतवणूक सवलत मिळण्यासाठी पात्र आहे का? Whether investment made in a plot for the construction of a residential house are eligible for exemption under section 54?
CBDT’s Circular स्पष्ट करते की निवासी घराच्या बांधकामासाठी जमिनीच्या plot मध्ये केलेली गुंतवणूक सवलत मिळण्यासाठी पात्र आहे. फक्त बांधकाम नमूद केलेल्या मुदतीत पूर्ण झाले तरच सवलत दिली जाईल.
11. Section 54 अंतर्गत सवलत कोणत्या परिस्थिती काढून घेतली जाऊ शकते? What are the circumstances in which exemption under section 54 can be withdrawn?
करदात्याने दावा केलेली सवलत खालील परिस्थितीत मागे घेतली जाऊ शकते:-
a) Capital Gains Scheme Account मध्ये जमा केलेली रक्कम नमूद केलेल्या कालमर्यादेत वापरली गेली नाही तर:- capital gain account scheme मध्ये असलेली Capital Gain ची रक्कम विक्रीच्या तारखेपासून 2 वर्षांच्या आत निवासी घराची मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा विक्रीच्या तारखेपासून 3 वर्षांच्या आत घराच्या बांधकामासाठी वापरली जात नसेल तर ती रक्कम long-term capital gainsमानली जाईल, ज्या वर्षी 2 वर्षे/3 वर्षांचा कालावधी संपेल.
b)3 वर्षांच्या आत नवीन घराची विक्री:-जर नवीन घर खरेदी किंवा बांधकाम पूर्ण झाल्याच्या तारखेपासून ३ वर्षांच्या आतच विकले गेले, तर नवीन घर विकल्यावर येणाऱ्या Capital gainच्या calculation च्या वेळी, Section 54 अंतर्गत सवलत म्हणून दावा केलेल्या Capital gain ची रक्कम नवीन घराच्या संपादनाच्या खर्चातून (cost of acquisition) वजा केली जाईल .
12. Capital Gains Scheme Account मध्ये असलेली रक्कम न वापरताच करदाता(व्यक्ती) मरण पावल्यास त्या रक्कमेचे काय होईल? What happens to the unutilised amount if the assessee (individual) dies before utilizing the deposit under Capital Gains Scheme Account?
CBDT ने स्पष्ट केले आहे की जर निर्धारित कालावधीत रक्कमेचा वापर न करता करदाता (व्यक्ती) मरण पावला, तर न वापरलेली रक्कम मृत व्यक्तीचे उत्पन्न मानली जाऊ शकत नाही. ही रक्कम कायदेशीर वारसांच्या हातातही taxable नसते कारण न वापरलेली रक्कम उत्पन्नाचे स्वरूप घेत नाही.
