Introduction
Pan card आयकर विभाग UTI किंवा NSDL द्वारे जारी करते. तुम्ही तुमचा पत्ता बदलला तरीही तुमच्या आयुष्यभरासाठी Pan card एकच राहते. आयकर विभागाकडून तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती ठेवण्यासाठी PAN चा वापर केला जातो जसे की कर भरणे, TDS/TCS credits, income returns इ. करचोरी आणि काळा पैसा रोखण्यासाठी करदात्याला अनेक आर्थिक व्यवहार करताना Pan card क्रमांक नमूद करणे अनिवार्य केले आहे.
वरील माहिती तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आपण सरकारी कामांसाठी, KYC साठी Pan Card देतच असतो पण आयकर विभागाने विशिष्ट व्यवहारांची यादी दिली आहे जी Income Tax च्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ते सामान्यपणे लोकांना माहित नसतात. जिथे Pan कार्ड देणे अनिवार्य आहे.
खालील व्यवहारांमध्ये Pan Card आवश्यक आहे:-
- मोटार वाहनाची विक्री किंवा खरेदी (दोन चाकी वाहने वगळून) ज्याचे रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते.
- बँकमध्ये किंवा कॉ-ऑपरेटिव्ह बँकमध्ये खाते उघडण्यासाठी.
- Debit or Credit Card च्या अर्जासाठी.
- Demat account उघडण्यासाठी.
- हॉटेल किंवा रेस्टॉरंटला एकाच वेळी ₹50,000 पेक्षा जास्त रकमेचे bill cash मध्ये दिले असल्यास.
- कोणत्याही परदेशी देशाच्या प्रवासासाठी किंवा कोणत्याही परकीय चलनाच्या खरेदीसाठी एकाच वेळी ₹50,000 पेक्षा जास्त रक्कम cash मध्ये दिले असल्यास.
- Mutual Fund चे units ₹50,000 पेक्षा जास्त रकमेचे खरेदी करण्यासाठी.
- कंपनी किंवा संस्थेचे debentures किंवा bonds ₹50,000 पेक्षा जास्त रकमेचे खरेदी करण्यासाठी.
- RBI चे bonds ₹50,000 पेक्षा जास्त रकमेचे खरेदी करण्यासाठी.
- बँकेत/कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत/ पोस्टात एका दिवसातच ₹50,000 पेक्षा जास्त Cash जमा केल्यास.
- बँकेत/कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत कोणत्याही एका दिवसात ₹50,000 पेक्षा जास्त रक्कमेचे बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर किंवा बँकरचे चेक खरेदी करण्यासाठी Cash भरल्यास.
- बँकेत/कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत/ पोस्टात Fixed Deposit(FD) एकाच वेळी ₹50,000 पेक्षा जास्त FD केल्यास किंवा आर्थिक वर्षात एकूण ₹५ लाखापेक्षा जास्त FD केल्यास.
- Pre-paid payment instruments साठी आर्थिक वर्षात ₹50,000 पेक्षा जास्त रक्कमेचे बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर किंवा बँकरचे चेकने payment केले असल्यास.
- एका आर्थिक वर्षात Life Insurance Premium ₹50,000 पेक्षा जास्त दिले असल्यास.
- प्रति व्यवहार ₹1 लाख पेक्षा जास्त रकमेच्या Securities (Shares वगळून) विक्री/खरेदीसाठी.
- Stock exchange वर list नसलेले कोणत्याही कंपनीचे Shares व्यक्तीने प्रति व्यवहार ₹1 लाखापेक्षा जास्त विक्री/खरेदी केल्यास.
- ₹10 लाख पेक्षा जास्त किंमतीची immovable property (स्थावर मालमत्ता) किंवा Section 50C नुसार Stamp Valuation Authorityने नमूद केलेली ₹10 लाखांपेक्षा जास्त रकमेची immovable property ची विक्री किंवा खरेदी केल्यास.
- वर नमूद केलेल्या व्यवहारां व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपाच्या goods किंवा services ची विक्री किंवा खरेदी प्रति व्यवहार 2 लाख पेक्षा जास्त रकमेसाठी असल्यास.
महत्वाचे मुद्दे:-
- Fixed Deposit (FD) आणि Life Insurance Premiumचे व्यवहार आर्थिक वर्षानुसार आहेत.
- Cash जमा करण्याचे आणि बँक ड्राफ्ट, पे ऑर्डर किंवा बँकरचे चेक खरेदी करण्याचे व्यवहार दिवसानुसार आहेत.
- Shares/Securities – प्रति व्यवहार ₹1 लाखाची मर्यादा आहे.
- बहुतेक व्यवहारांच्या मर्यादा ₹50,000 आहेत.
Pan Card नियमाला अपवाद:-
- ज्या व्यक्तीकडे Pan नाही आणि आणि जो वर नमूद केलेल्या व्यवहारांपैकी कोणताही व्यवहार करतो, त्याने Form No.60 भरून त्यामध्ये अशा व्यवहाराची माहिती द्यावी. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जर तुमचे उत्पन्न taxable limit च्या (करपात्र मर्यादा) खाली असेल तर तुमच्याकडे Pan card असणे अनिवार्य नाही. बँक खाते उघडणे, ₹50,000 पेक्षा जास्त mutual fund खरेदी करणे इत्यादी सारख्या विशिष्ट व्यवहारांसाठी, तुम्ही Form 60 वर स्वाक्षरी करू शकता की तुमच्याकडे Pan card नाही आणि उत्पन्न देखील taxable limit च्या (करपात्र मर्यादा) खाली आहे.
- अल्पवयीन मुलाचा/मुलीचा taxable income नसेल तर आईवडील किंवा पालकांचा Pan Card वापरण्याची परवानगी आहे.
- अनिवासी भारतीयांना(NRIs) पुढील व्यवहारांमध्ये Pan द्यावे लागणार नाही:- Debit or Credit Card च्या अर्जासाठी, हॉटेलच्या बिलासाठी, परदेशी देशाच्या प्रवासासाठी किंवा परकीय चलनाच्या खरेदीसाठी, RBI bonds च्या खरेदीसाठी, बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर किंवा बँकरचे चेक खरेदीसाठी, Pre-paid payment instruments साठी.
Pan Card च्या बदल्यात आधार कार्डचा वापर:-
व्यवहार करताना जिथे Pan card देणे आवश्यक आहे तिथे आधार कार्ड वापरता येईल फक्त Aadhar card आणि Pan card link असायला पाहिजे. थोडक्यात income tax return भरताना किंवा वरील नमूद केलेले व्यवहार करताना Pan card ऐवजी Aadhar card वापरता येईल जर Pan card आणि Aadhar card link असेल तर.
आपल्या सर्वांना KYC मुळे Pan card मागितले की देण्याची सवय लागली आहे. Pan card online किंवा offline पद्धतीने कसे मिळवायचे हे ही बऱ्याच ठिकाणी वाचून माहित झाले आहे. पण income tax च्या दृष्टीने कुठे कुठे Pan card देणे गरजेचे आहे, केव्हा दिले नाही तरी चालेल हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण जेव्हा वरील नमूद केलेले व्यवहार दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे करतो तेव्हा आपण Pan card देऊन आयकर विभागाला अश्या व्यवहारांची माहिती देत असतो.