शेतजमीन विकताय!!Capital Gain Tax वाचवा!!

शेतजमीन विकल्यावर येणाऱ्या Capital Gain Tax वर सवलत कशी मिळेल?

Introduction

एखाद्या शेतकऱ्याला काही कारणास्तव शेतजमीन दुसरीकडे घ्यावयाची आहे आणि म्हणून त्याने आपली जुनी शेतजमीन विकली आणि त्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून त्याने दुसरी शेतजमीन खरेदी केली. यामध्ये शेतकऱ्याचा उद्देश जमीन विकून उत्पन्न मिळवणे हा नसून दुसरी जमीन घेणे हा आहे तर अश्या वेळेस त्याला जुन्या जमिनीच्या विक्रीवर येणाऱ्या Capital gain tax देणे त्रासदायक ठरेल. Section 54B of IT Act अशा त्रासातून सुटका देते जेणेकरून शेतकरी विक्रीतून मिळालेल्या पैशातून दुसरी शेतजमीन घेऊ शकेल.

Basic conditions

Section 54B चा लाभ  घेण्यासाठी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत:-

  1. हा लाभ फक्त व्यक्ती( Individual ) किंवा HUF ( Hindu Undivided Family ) साठी उपलब्ध आहे.
  2. विकलेली मालमत्ता ही शेतजमीन असायला पाहिजे. जमीन  long-term capital  or short-term capital Asset असायला पाहिजे.
  3. व्यक्तीने किंवा त्याच्या पालकांनी विक्रीच्या तारखेच्या आधी किमान दोन वर्षांच्या कालावधीसाठी शेतजमीन शेतकामासाठी वापरली पाहिजे.                                                                                                                   वरील अट HUF ला पण लागू आहे फक्त शेतजमीन HUF च्या कोणत्याही सदस्याने वापरणे गरजेचे आहे
  4. जुनी जमीन  विकल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत करदात्याने दुसरी शेतजमीन  विकत घेतली पाहिजे.
  5. सक्तीच्या संपादनाच्या (म्हणजे Compulsory Acquisition) बाबतीत नवीन शेतजमीन विकत घेण्याचा कालावधी नुकसान भरपाई मिळाल्याच्या तारखेपासून (म्हणजे date of receipt of compensation)निश्चित केला जातो.           जर शेतजमीन कोणत्याही कायद्यांतर्गत सक्तीने घेतली गेली असेल आणि ज्याची रक्कम केंद्र सरकार किंवा RBI  मंजूर करत असेल आणि ही रक्कम 01-04-2004 रोजी किंवा नंतर मिळत असेल तर Section 10(37) of IT Act नुसार, एखाद्या व्यक्तीवर किंवा HUFवर  कोणताही Capital gain कर म्हणून आकारला जाणार नाही.

सवलतीची रक्कम :

Section 54B अंतर्गत सवलतची रक्कम ही खालीलपैकी कमी रक्कम असेल:

  • शेतजमिनी  विकल्यावर येणाऱ्या Capital Gains ची रक्कम; किंवा
  • नवीन शेतजमिनीत गुंतवणूक केलेली रक्कम [Capital Gains Deposit Account Scheme मध्ये जमा केलेल्या रकमेचा समावेश आहे. ]
हा लाभ घेण्यासाठी, करदात्याने जुनी शेतजमीन विकल्याच्या तारखेच्यापासून दोन वर्षांच्या आत दुसरी शेतजमीन विकत घेतली पाहिजे.
हा लाभ घेण्यासाठी, करदात्याने जुनी शेतजमीन विकल्याच्या तारखेच्यापासून दोन वर्षांच्या आत दुसरी शेतजमीन विकत घेतली पाहिजे.

नवीन जमीन विक्री केल्यास त्याचे होणारे परिणाम

या लाभाच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी Section 54B मध्ये प्रतिबंध घालण्यात आला आहे. नवीन शेतजमिनीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

जर एखाद्या करदात्याने Section 54B अंतर्गत सवलत मिळण्यासाठी नवीन शेतजमीन खरेदी केली आणि त्यानंतर त्याने नवीन शेतजमीन विकत घेतल्यापासून 3 वर्षांच्या आतच विकली तर हा सवलतीचा लाभ काढून घेतला जाईल. निर्बंध खालील प्रमाणे असेल:

  • जर शेतजमीन खरेदी केल्याच्या तारखेपासून 3 वर्षांच्या आत विकली गेली आणि नवीन जमीन विकल्यावर येणाऱ्या Capital gain च्या calculation च्या वेळी, सवलत म्हणून दावा केलेल्या Capital gain ची रक्कम नवीन शेतजमिनीच्या विक्रीच्या खर्चातून (cost of acquisition) वजा केली जाईल.

Capital Gain Deposit Account Scheme

वर सांगितल्या प्रमाणे करदात्याने जुनी जमीन विकल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत दुसरी शेतजमीन खरेदी केली पाहिजे.

जर Income tax returnभरण्याच्या तारखेपर्यंत, जुन्या जमिनीच्या  विक्रीमुळे येणारा  Capital gain (संपूर्ण किंवा अंशतः) दुसरी शेतजमीन खरेदीसाठी वापरला गेला नाही,तर अशा न वापरलेल्या Capital gain ची रक्कम Capital Gains Deposit Accounts Scheme, 1988 नुसार public sector बँकच्या कोणत्याही शाखेत Capital Gains Deposit Account Scheme मध्ये जमा करून सवलतीचा लाभ घेता येईल.                                                                                     2 वर्षांच्या नमूद केलेल्या कालमर्यादेत सदर खात्यातून रक्कम काढून नवीन जमीन खरेदी केली जाऊ शकते.

Capital Gain Deposit Account scheme मध्ये जमा केलेल्या रकमेचा वापर न केल्यास

जर Capital Gains Account scheme मध्ये भरलेली रक्कम ज्यावर करदात्याने सवलत घेतली आहे पण नमूद केलेल्या वेळेत दुसरी शेतजमीन खरेदी करण्यासाठी ती वापरली गेली नाही तर अशा वापर न झालेल्या रकमेवर( ज्यावर सवलतीचा चा दावा केला आहे) मागील वर्षासाठी long-term capital gains or short-term capital gain द्वारे Income  tax आकारला जाईल (हे original capital gain च्या स्वरूपावर अवलंबून असेल ) ज्यामध्ये २ वर्षाचा नमूद केलेला कालावधी संपेल.

SUMMARY

  1.  Section 54B of IT Act करदात्याला दिलासा देते जो आपली शेतजमीन विकतो आणि विक्रीच्या रकमेतून दुसरी शेतजमीन विकत घेतो
  2. Section 54B चा लाभ फक्त व्यक्ती( Individual ) किंवा HUF साठी उपलब्ध आहे.
  3. व्यक्तीने किंवा त्याच्या पालकांनी विक्रीच्या तारखेच्या आधी किमान दोन वर्षांच्या कालावधीसाठी शेतजमीन  शेतकामासाठी वापरली पाहिजे.
  4. हा लाभ घेण्यासाठी, करदात्याने जुनी शेतजमीन विकल्याच्या तारखेच्यापासून दोन वर्षांच्या आत दुसरी शेतजमीन विकत घेतली पाहिजे.
  5. Section 54B अंतर्गत सवलतची रक्कम ही खालीलपैकी कमी रक्कम असेल:
    • शेतजमिनी विकल्यावर येणाऱ्या Capital Gains ची रक्कम; किंवा
    • नवीन शेतजमिनीत गुंतवणूक केलेली रक्कम [Capital Gains Deposit Account Scheme मध्ये जमा केलेल्या रकमेचा समावेश आहे. ]
  6. जर करदात्याने Section 54B अंतर्गत सवलत मिळण्यासाठी नवीन शेतजमीन खरेदी केली आणि त्यानंतर त्याने नवीन शेतजमीन विकत घेतल्याच्या तारखेपासून 3 वर्षांच्या आतच विकली तर हा दिलेला लाभ काढून घेतला जाईल.
  7. जर Income tax return भरण्याच्या तारखेपर्यंत, जुन्या जमिनीच्या विक्रीमुळे येणारा  Capital gain (संपूर्ण किंवा अंशतः) दुसरी शेतजमीन खरेदीसाठी वापरला गेला नाही,तर अशा न वापरलेल्या Capital gain ची रक्कम Capital Gains Deposit Accounts Scheme, 1988 नुसार public sector बँकच्या कोणत्याही शाखेत Capital Gains Deposit Account Scheme मध्ये जमा करून सवलती चा लाभ घेता येईल.
  8. जर Capital Gains Account scheme मध्ये भरलेली रक्कम ज्यावर करदात्याने सवलत घेतली आहे पण नमूद केलेल्या वेळेत दुसरी शेतजमीन खरेदी करण्यासाठी ती वापरली गेली नाही तर अशा वापर न झालेल्या रकमेवर( ज्यावर सवलतीचा दावा केला आहे)मागील वर्षासाठी long-term capital gains or short-term capital gain द्वारे Income  tax आकारला जाईल (हे original capital gain च्या स्वरूपावर अवलंबून असेल ) ज्यामध्ये २ वर्षाचा नमूद केलेला कालावधी संपेल.

FAQ:-

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top