शेतजमीन विकताय! Capital Gain वाचवा!

शेतजमीन विकल्यावर येणाऱ्या Capital Gain वर सवलत कशी मिळेल?

FAQ

1. What is Section 54B of the Income-tax Act? Section 54B , IT Act काय आहे?

Section 54B अंतर्गत शेतजमिनी विकल्यावर येणाऱ्या Capital Gain वर सवलत दिली जाते. निर्धारित मुदतीत Capital Gain ची रक्कम नवीन शेतजमीन खरेदीसाठी गुंतवल्यास सवलत मिळू शकते.

2. Who can claim exemption under section 54B? Section 54B नुसार सवलत मिळण्याचा दावा कोण करू शकतो?

केवळ व्यक्ती ( Individual ) किंवा HUF या Section अंतर्गत सवलती चा दावा करण्यास पात्र आहेत.

3. Which capital asset is qualified for Section 54B exemption? Section 54B सवलतीसाठी कोणते Capital Asset पात्र आहे?

शेतजमिनीच्या विक्रीमुळे येणाऱ्या capital gain वर सवलत मिळू शकते. विक्री केलेल्या शेतजमिनीचा वापर विक्रीच्या तारखेपूर्वी किमान 2 वर्षांच्या कालावधीसाठी शेतीसाठी वापर करणे आवश्यक आहे. जमिनीची मालकी कोणाकडेही असली तरीही शेतजमिनीचा वापर करदात्याने स्वतः, त्याच्या पालकांनी किंवा HUF नी केला तरच ही सवलत मिळेल.        Long-term or Short-term capital asset च्या विक्रीनंतर येणाऱ्या capital gain वर सवलत दिले जाते. पुढे, सवलत फक्त शहरी शेतजमिनीच्या विक्रीवर उपलब्ध आहे. ग्रामीण शेतजमीन capital asset म्हणून गणली जात नाही आणि त्यामुळे ती Capital Gain Tax च्या कक्षेबाहेर आहे.

4.Which new asset should be acquired for claiming exemption under section 54B? Section 54B अंतर्गत Exemption मिळविण्यासाठी कोणती नवीन मालमत्ता संपादित करावी?

जर शेतजमिनीच्या विक्रीतून मिळालेली रक्कम शेतजमिनीत गुंतवली असेल तर या section अंतर्गत सवलत मिळेल. नवीन शेतजमीन ग्रामीण भागात किंवा शहरी भागात असू शकते.

5.What is the maximum amount of exemption allowed under section 54B? Section 54B अंतर्गत जास्तीत जास्त किती सवलत दिली जाते?

Section 54B अंतर्गत सवलतची रक्कम खालीलपैकी कमी रक्कम असेल:

    • शेतजमिनी विकल्यावर येणाऱ्या Capital Gains ची रक्कम; किंवा
    • नवीन शेतजमिनीत गुंतवणूक केलेली रक्कम [Capital Gains Deposit Account Scheme मध्ये जमा केलेल्या रकमेचा समावेश आहे. ] 

6.What is the prescribed time limit for investment in new asset under section 54B?Section 54B अंतर्गत नवीन मालमत्तेमध्ये गुंतवणुकीसाठी निर्धारित कालावधी किती आहे?

या Section अंतर्गत सवलत मिळवण्यासाठी करदात्याने  मूळ जमिनीच्या विक्रीच्या तारखेनंतर 2 वर्षांच्या आत शेतजमीन खरेदी करणे आवश्यक आहे.

7. Capital Gain Account Scheme मध्ये capital gains ची रक्कम जमा केली तर सवलत मिळेल का?

जर  Income tax return भरण्याच्या तारखेपर्यंत, जुन्या जमिनीच्या  विक्रीमुळे येणारा  Capital gain (संपूर्ण किंवा अंशतः) दुसरी शेतजमीन खरेदीसाठी वापरला गेला नाही,तर अशा न वापरलेल्या Capital gain ची रक्कम Capital Gains Deposit Accounts Scheme, 1988 नुसार public sector बँकच्या कोणत्याही शाखेत Capital Gains Deposit Account Scheme मध्ये जमा करून  सवलतीचा लाभ घेता येईल. 2 वर्षांच्या नमूद केलेल्या कालमर्यादेत सदर खात्यातून रक्कम काढून नवीन जमीन खरेदी केली जाऊ शकते.

8.What are the circumstances in which exemption under section 54B can be withdrawn? कोणत्या परिस्थितीत section 54B अंतर्गत सवलत मागे घेतली जाऊ शकते?

Section 54B अंतर्गत करदात्याने दावा केलेले Exemption खालील परिस्थितीत मागे घेतली जाऊ शकते :

(a) ३ वर्षांच्या आत नवीन शेतजमिनीचे हस्तांतरण:-

जरकरदात्याने Section 54B अंतर्गत सवलत मिळण्यासाठी नवीन शेतजमीन खरेदी केली आणि त्यानंतर त्याने नवीन शेतजमीन  घेतल्याच्या तारखेपासून 3 वर्षांच्या आतच विकली तर  दिलेला लाभ काढून घेतला जाईल.

जर शेतजमीन खरेदी केल्याच्या तारखेपासून 3 वर्षांच्या आत विकली गेली, तर नवीन जमीन विकल्यावर येणाऱ्या Capital gain च्या calculation च्या वेळी, सवलत म्हणून दावा केलेल्या Capital gain ची रक्कम नवीन शेतजमिनीच्या विक्रीच्या खर्चातून (cost of acquisition) वजा केली जाईल.

(b)Capital Gains Scheme Account मध्ये जमा केलेली रक्कम निर्धारित मुदतीत वापरली गेली नाही तर:-                       जर Capital Gains Account scheme मध्ये भरलेली रक्कम ज्यावर करदात्याने सवलत घेतली आहे पण नमूद केलेल्या वेळेत दुसरी शेतजमीन खरेदी करण्यासाठी ती वापरली गेली नाही तर अशा वापर न झालेल्या रकमेवर( ज्यावर exemption चा दावा केला आहे)मागील वर्षासाठी long-term capital gains or short-term capital gain द्वारे Income  tax आकारला जाईल/(हे original capital gain च्या स्वरूपावर अवलंबून असेल ) ज्यामध्ये २ वर्षाचा नमूद केलेला कालावधी संपेल.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top